Chairmen Desk

महाबळेश्वर मद्यउत्पादक सहकारी सोसायटी  लिमिटेड 
अपवादात्मक संस्थेवर नैसर्गिक आपत्ती वगळता संस्थेचा विकास करणेसाठी माझे संचालक मंडळ यांचे मदतीने प्रयत्न केला आहे .व संस्थेच्या सर्व सेवकांनी चांगले प्रयत्न केले आहेत . यामध्ये संस्थेची उत्पादने दर्जेदार बनवण्यासाठी व मधाचे आकर्षक पॅकिंग करून ए ग्रेड मध्ये विक्री करण्यासाठी बाजारपेठेत आणले आहे. त्यामुळे विक्री व्यवस्थेमध्ये सुधारणा झाली आहे .संस्थेच्या उन्नतीसाठी खेळीमेळीच्या वातावरणात सर्व विषय एकमताने चर्चला घेऊन निर्णय घेतले आहेत .त्यासाठी माझे सहकारी संचालक मंडळ यांनी संस्थेच्या कामकाजामध्ये भाग घेऊन सतत सहकार्य केले आहे.

 सहकारी खात्याचे अधिकारी व खादी ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी व त्यांचे सहकारी तसेच फॉरेस्ट खात्याचे अधिकारी व त्यांचे सहकारी वर्गने दिलेल्या सहकार्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. तसेच संस्थेच्या उत्पादित मालाची विक्री करणारे व्यापारी वर्ग यांनी संस्थेच्या उत्पादित मालाची जास्तीत जास्त विक्री करून सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो . तसेच संस्थेच्या सर्व उत्पादनासाठी आय एस ओ नामंकन घेतले  आहे. तसेच संस्थेचे  टी एम रजिस्ट्रेशन पूर्ण केले आहे. व संस्थेने महाबळेश्वर स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट असे काम केले आहे त्या कामाचे कौतुक म्हणून महाबळेश्वर नगरपालिकेने संस्थेस रुपये दहा हजार बक्षीस दिले आहे.
 अशी संस्थेच्या हिताची व प्रगतीची कामे संस्था हातात घेऊन प्रगतीची वाटचाल करत आहे . यासाठी सर्वांचे आभार मानून कार्यकारी मंडळाच्या वतीने हिशोब पत्रके मंजुरीसाठी सादर करून आपणास सर्वांना उदंड आयुष्य , आरोग्य , सौख्य , समृद्धी लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मनोगत पूर्ण करतो.
 जय हिंद ! जय महाराष्ट्र!! जय सहकार !!!

संजय रामचंद्र गायकवाड (बाबा)

            चेअरमन